IMG-LOGO
राष्ट्रीय

"माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा!"

Sunday, Sep 06
IMG

राऊत यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर झालेली राजकीय उलथापालथ लक्षात आणून दिली आहे.

मुंबई, दि. ०६ सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौत हीच उल्लेख 'हरामखोर' मुलगी असा केल्याने शिवसेना खासदार संजय विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. अशातच आता राऊत यांनी टीकाकारांना आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं आहे. राऊत यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर झालेली राजकीय उलथापालथ लक्षात आणून दिली आहे.आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावर लिहिलेल्या एका संदेशामध्ये राऊत म्हणतात, 'माझी ताकद काय आहे, हे त्या लोकांना विचारा, ज्यांच्याकडे १०५ आमदार असूनही विरोधकांच्या बाकांवर बसण्याची वेळ आली. जय महाराष्ट्र.' असे फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे.

Share: