रेमोची प्रकृती स्थिर असून रेमो हा बॉलिवूडचा दिग्गज कोरिओग्राफर म्हणून ओळखला जातो. दिग्दर्शक अशीही त्याची ओळख आहे. एबीसीडी, एबीसीडी 2, आणि स्ट्रीट डान्सर थ्रीडी या चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केले आहे.
मुंबई, दि. ११ डिसेंबर : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूजा याला हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर त्याला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.रेमोची प्रकृती स्थिर असून रेमो हा बॉलिवूडचा दिग्गज कोरिओग्राफर म्हणून ओळखला जातो. दिग्दर्शक अशीही त्याची ओळख आहे. एबीसीडी, एबीसीडी 2, आणि स्ट्रीट डान्सर थ्रीडी या चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केले आहे. डान्स इंडिया डान्स, डान्स प्लस आणि झलक दिखला जा यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये तो जजच्या भूमिकेत दिसला आहे. याच रिअॅलिटी शोमधल्या स्पर्धकांना घेऊन त्याने 'एबीसीडी' हा डान्सवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला. डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमधून रेमोचं नाव चर्चेत आलं. टेरेन्स लुईस आणि गीता कपूर यांच्यासोबत त्याने या शोमध्ये परीक्षकाची भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडली.