IMG-LOGO
मुंबई

मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या रिपब्लिक भारत प्रतिनिधीच्या कानशिलात लगावली

Thursday, Sep 24
IMG

अत्यंत आरडाओरड करत रिपोर्टिंग करताना रिपब्लिकचे पत्रकार अन्य पत्रकारांच्या कामात प्रचंड व्यत्यय आणत होते.

मुंबई, दि. २४ सप्टेंबर  : मुंबईत रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं आपल्याला एनडीटीव्ही व एबीपीच्या पत्रकारांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. भंडारी हे मुंबईतल्या पत्रकारांना चाय बिस्कुट पत्रकार म्हणून हिणवत होते, थोडक्यात तुम्ही खरी पत्रकारिता करत नाही, ती आम्ही करतो असं ते डिवचत असल्याचं काही पत्रकारांनी सांगितलं. तसंच अत्यंत आरडाओरड करत  रिपोर्टिंग करताना रिपब्लिकचे पत्रकार अन्य पत्रकारांच्या कामात प्रचंड व्यत्यय आणत होते.  महाराष्ट्रात सत्य बोलण्याची काय किंमत आहे माहिती आहे का? ड्रग्ज रॅकेटमधील प्रसिद्ध चेहरे समोर आणल्याने यांचा संताप वाढत आहे. जेव्हा पोलिसांमार्फत काही झालं नाही तर आज एनडीटीव्ही आणि एबीपीच्या गुंड पत्रकारांना माझ्यासोबत हाणामारी करण्यासाठी पाठवलं. पण मी माघार घेणाऱ्यांपैकी नाही”. असं ट्विट प्रदीप भंडारी यांनी केले आहे. 

Share: