देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांनी निशाणा साधला होता. त्यांच्या याच टीकेला रोहित यांनी तितकचं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई, दि. ३० ऑगस्ट : जीएसटी परताव्याच्या मुद्द्यावरून रोहित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांनी निशाणा साधला होता. त्यांच्या याच टीकेला रोहित यांनी तितकचं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'अभ्यास' करणाऱ्या नेत्याने 'अभ्यास' न करताच माझ्यावर टीका का केली, याचं आश्चर्य वाटलं. पण ठीक आहे बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असल्यामुळं 'अभ्यास' करायला त्यांना वेळ मिळाला नसेल म्हणून त्यांनी टीका केली असावी, असा टोला रोहित पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे. तसंच भलीमोठी फेसबुक पोस्ट लिहित त्यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.