IMG-LOGO
महाराष्ट्र

रोहित पवारांनी ट्विट करत पुन्हा एकदा साधला केंद्र सरकारवर निशाणा

Friday, Dec 18
IMG

तत्कालीन राज्य सरकारच्या घाईघाईत ३२९० कोटी रुपयांचा एलबीटी माफ करण्याच्या चुकीमुळं राज्याचं २८००० कोटींपेक्षा अधिक नुकसान झालं. ही चूक झाली नसती

मुंबई, दि. १८ डिसेंबर : कोरोना संकटामुळं राज्याच्या तिजोरीला फटका बसला आहे. कोरोनासोबतच 'निसर्ग' चक्रीवादळ, 'अतिवृष्टी' या संकटांमुळंही राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. यावरुनच राज्य सरकारकडून वेळोवेळी केंद्रानं जीएसटीचे पैसे थकवल्याचा आरोप वारंवार होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या मुद्द्यावर एक ट्विट केलं आहे.रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. 'निवडणूक डोळ्यांपुढं ठेवून २०१५-१६मध्ये तत्कालीन राज्य सरकारच्या घाईघाईत ३२९० कोटी रुपयांचा एलबीटी माफ करण्याच्या चुकीमुळं राज्याचं २८००० कोटींपेक्षा अधिक नुकसान झालं. ही चूक झाली नसती, तर यंदा अंत्यत अडचणीच्या वर्षात आपल्याला जीएसटी भरपाईपोटी ६३०० कोटीपेक्षाही अधिक निधी मिळाला असता,' असं म्हणत रोहित पवारांनी पु्न्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Share: