शनिवारी एनआयएनने वाझे यांनी तब्बल 13 तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर ‘एनआयए’ने त्यांना अटक केली. वाझे यांचे निकटवर्तीय आणि पोलिस अधिकारी रियाझ काझी हे गेले अनेक वर्षे मुंबई पोलिस दलात काम करीत आहेत.
मुंबई, दि. १४ मार्च : मनसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, वाझे यांच्या सहकार्यांंचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. वाझे यांना झालेली अटक, त्यांच्या चौकशीत बाहेर येणारे मुद्दे यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शनिवारी एनआयएनने वाझे यांनी तब्बल 13 तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर ‘एनआयए’ने त्यांना अटक केली. वाझे यांचे निकटवर्तीय आणि पोलिस अधिकारी रियाझ काझी हे गेले अनेक वर्षे मुंबई पोलिस दलात काम करीत आहेत. सध्या काझी हे सीआययू विभागात कार्यरत आहेत. अलीकडेच जानेवारी महिन्यात टीआरपी घोटाळ्याप्रकरणी केलेल्या कामगिरीबद्दल बेस्ट डिटेक्शन म्हणून मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त शशिकांत सांडभोर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे, नितीन लोंढे, संतोष कोटवान आणि रियाझ काझी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. काझी यांच्या चौकशीनंतर क्राईम ब्रँचच्या आणखी काही पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विक्रोळी पोलिस ठाण्यातील पोलिसदेखील एनआयएच्या चौकशीच्या फेर्यात अडकण्याची शक्यता आहे. 18 फेब्रुवारीला विक्रोळी पोलिसांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आणि कोणत्या पोलिस अधिकार्याच्या इशार्यावरून स्कॉर्पिओ चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली गेली, याचा तपास एनआयए करू शकते. आतापर्यंतच्या चौकशीत वाझे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली आहे. त्यामुळे आता आगामी काळात याप्रकरणातील आणखी कोणत्या गोष्टी बाहेर येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. एनआयएच्या कार्यालयात वाझे यांचे सहकारी असलेल्या क्राईम ब्रँचच्या युनिटमधील चार अधिकार्यांची चौकशी सुरू आहे. यापैकी वाझे यांचे सहकारी रियाझ काझी यांची पाच तासांपेक्षा अधिक काळापासून चौकशी सुरू होती.स्फोटकासाठीच्या गाड्या गुप्तवार्ता विभागाच्यादेशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती असणार्या मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही गाड्या मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. वाझे यांनी स्वत:च राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकार्यांना या इनोव्हा कारबद्दल माहिती दिली. त्यानंतर एनआयएने ही कार ताब्यात घेऊन कार्यालयात आणली. याशिवाय, अंबानी यांच्या घराबाहेर ज्या कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती, ती स्कॉर्पिओ कारही पोलिसांचीच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हीच स्कॉर्पिओ गाडी अन्वय नाईक प्रकरणातील आरोपी अर्णव गोस्वामी यांना अटक करताना वापरण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.सरकार कोसळणारः कंगणाया प्रकरणात एक मोठे कटकारस्थान शिजत असल्याचे मला दिसते आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतर या अधिकार्याला परत सेवेत घेण्यात आले. याचा जर योग्य तपास केला तर केवळ या प्रकरणातील रहस्यच बाहेर येणार नाही, तर राज्यातील सरकार कोसळेल. त्याचवेळी माझ्यावर 200 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतील असे माझे मन सांगत आहे. जय हिंद, असे कंगणाने म्हटले आहे.