IMG-LOGO
महाराष्ट्र

सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

Saturday, Mar 13
IMG

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या पत्नीने वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे.

ठाणे, दि. १३ मार्च  : पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचा अंतरिम जामीनअर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या पत्नीने वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे वाझे संशयाच्या भोवर्‍यात आहेत. याप्रकरणात वाझे यांनी  अटकपूर्व जामीनअर्ज केला होता. ठाणे सत्र न्यायालयाने वाझे यांचा अंतरिम जामीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळला आहे. आता याप्रकरणात पुढील सुनावणी 19 तारखेला ठेवण्यात आलेली आहे. जामीनअर्ज फेटाळताना न्यायालयाने स्पष्ट म्हटले, की त्यांच्याविरुद्ध प्राथमिक पुरावे आहेत, कोठडीतील तपासाची गरज आहे. वाझे यांनी काल न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी अटकपूर्व जामीन मागितला. त्याला न्यायालयाने नकार दिला होता.न्याायलयाने वाझे यांच्याबाबत गंभीर नोंदी केल्या आहेत. हा गुन्हा हत्येच्या कलमांतर्गत नोंदवला आहे, असे न्यायलयाने स्पष्टपणे सांगितले आहे. हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात, गुन्हेगारी, कट कारस्थान दिसत आहे. प्राथमिकदृष्ट्या हे सर्व अर्जदाराच्या विरोधात आहे. दुसरीकडे एटीएसनेही कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. म्हणूनच अर्जदार वाझे यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

Share: