IMG-LOGO
राष्ट्रीय

कोरोना कर लावण्याचा विचार नाही

Sunday, Feb 07
IMG

कोरोना संकटाच्या काळात सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली. कोरोना कर किंवा उपकर लावण्याबाबत माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली.

मुंबई, दि. ७ फेब्रुवारी  : कोरोना कर किंवा उपकर लावण्याचा कोणताही विचार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले.  मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी कोरोना संकटाच्या काळात सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली. कोरोना कर किंवा उपकर लावण्याबाबत  माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. कोरोना कर किंवा उपकराबाबत का चर्चा सुरू झाली, याची मला माहिती नाही; परंतु केंद्र सरकारकडून असा कोणताही कर लावण्याचा कधीही विचार केला गेला नाही, असे त्यांनी सांगितले. कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने चांगली कामगिरी केली. जागतिक स्तरावरील विकसित अर्थव्यवस्था संघर्ष करत होत्या, तेव्हा भारताने यातून बचावाचा मार्ग शोधून काढला. प्रथमच करदात्यांच्या पैशांचा वापर योग्य पद्धतीने आणि विचार-विनिमय करून करण्यात आला, असे सीतारामण म्हणाल्या. केंद्र सरकारकडून काही सरकारी संस्थांमधील हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ’कुटुंबातील किमती सामान विकण्याचा’ आरोप सरकारवर केला जात आहे. हे आरोप फेटाळत केंद्र सरकारचे निर्गुंतवणुकीबाबतचे धोरण स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Share: