2018 साली काँग्रेसचे खजिनदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. पटेल आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते
नवी दिल्ली, दि. २५ नोव्हेंबर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं निधन झालं आहे. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 71 वर्षांचे पटेल यांनी दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. अहमद पटेल काँग्रेस पक्षाचे खजिनदार होते. अहमद पटेल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार होते, तोपर्यंत पक्षात त्यांचं मोठं वजन होतं. 1985 साली ते राजीव गांधींचे संसदीय सचिवही होते.2018 साली काँग्रेसचे खजिनदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. पटेल आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते, तर पाच वेळा राज्यसभेवर. 2017 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीची खूप चर्चाही झाली होती.