निवडणूक आयोगाने बिस्कीट हे चिन्ह बदलून द्यावं, अशी मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती.
पाटणा, दि. १३ ऑक्टोबर : निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिले होते. शिवसेनेने त्यावर तीव्र नापसंती व्यक्त करत चिन्ह बदलून द्यावे अशी मागणी केली होती. अखेर शिवसेनेची मागणी मान्य करत निवडणूक आयोगाने शिवसेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह दिले आहे.शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर नितीश कुमार यांच्या जदयूने आक्षेप घेतला होता. जदयूचे निवडणूक चिन्ह बाण आहे. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाची निशाणी धनुष्यबाण असल्याने मतदारांचा गोंधळ होतो, असा जदयूच्या आक्षेपचा मुद्दा होता. निवडणूक आयोगाने बिस्कीट हे चिन्ह बदलून द्यावं, अशी मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह देण्यात यावे, असे शिवसेनेने निवडणूक आयोगाला सुचवले होते. पण ही तीनही चिन्ह आधीच अन्य काही उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटाऐवजी तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्ह बदलून दिले आहे.