IMG-LOGO
मनोरंजन

गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण, घरात क्वारंटाईन

Friday, Oct 16
IMG

विमानाने प्रवास करण्यापूर्वी कोरोनाची तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

मुंबई, दि. १६ ऑक्टोबर : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाली आहे.  अमेरिकेत काही दिवस पत्नी सलोनी आणि मुली शनॉन व अॅनाबेल यांच्यासोबत राहण्याचा प्लॅन करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. येत्या २० ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस असून हा दिवस कुटुंबीयांसोबत घालवण्याची त्यांची इच्छा होती. विमानाने प्रवास करण्यापूर्वी कोरोनाची तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे अमेरिकेत जाणे रद्द झाले. बीएमसीने त्यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे.

Share: