गेल्या मंगळवारपासून त्यांच्या शरिरातील प्रमुख अवयवांनी कार्य करणे बंद केल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
नवी दिल्ली, दि. ११ सप्टेंबर : सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं दिल्लीमधील रुग्णालयात निधन झालं आहे. ते लिव्हरच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना दिल्लीमधील आयएसबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या चमूने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले अखेर संध्याकाळी 6.45 वाजता डॉ. शिव सरीन यांनी अग्निवेश यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं.गेल्या मंगळवारपासून त्यांच्या शरिरातील प्रमुख अवयवांनी कार्य करणे बंद केल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून होती, परंतु अखेर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव उद्या सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी दिल्लीतील जंतरमंतर रोडवरील कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर शनिवारी संध्याकाळी ४ वाजता गुरुग्राम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील असं बंधुआ मुक्ती मोर्चा आणि सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभेचे कार्यवाह स्वामी आर्यवेश यांनी सांगितलं आहे.