शासकीय शुल्क हे फक्त कोविड उपचारासाठी आहेत परंतु पेशंटला इतर आजारांवरही उपचार करावे लागतात.
नाशिक,दि.०१ ऑक्टोबर : अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल मधून आज पर्यंत या कोविढ महामारित पंधराशे ते सोळाशे पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन समाधानी घरी गेले आहेत, पण फक्त तीन चार रुग्ण तक्रार करीत आहेत यात कोणाचा तरी वेगळा उद्देश आहे असे स्पष्ट होते, सदर ची तक्रारी बद्दल हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून नेहमीच सविस्तर उत्तर दिले गेले आहे, शासकीय शुल्क हे फक्त कोविड उपचारासाठी आहेत परंतु पेशंटला इतर आजारांवरही उपचार करावे लागतात व नाईलाजाने त्याचे शुल्क अधिक आकरावे लागतात. सदर च्या तक्रारी संदर्भात हॉस्पिटल कडून नेहमीच सर्व बिल हे शासकीय नियमानुसार कसे बरोबर आहे व त्यातील (Inclusion व Exclusion) कसे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाकडून काही ऐकण्याची भूमिका घेतली गेली नाही. तरी पण जिथे नाशिकच्या जास्तीत जास्त कोविढ रुग्णांना ज्या हॉस्पिटल ने बरे केले आहे.. त्याच हॉस्पिटल वर गुन्हा दाखल करण्यात आल्याने... अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल तर्फे कायदेशीर उत्तर दिले जाईल.