IMG-LOGO
साहित्य संमेलन

राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलनाचे नाशकात आयोजन

Thursday, Feb 04
IMG

द्वितीय सत्रात डिजिटल युगातील पुस्तकांचे महत्त्व विषयावर परिसंवाद होईल. त्यात प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे, कवी विवेक उगलमुगले, संपादक घनश्याम पाटील, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील किरण सोनार आदी सहभाग नोंदवतील.

नाशिक; दि. ४ फेब्रुवारी : येथील साहित्यकणा फाउंडेशनच्यावतीने येत्या रविवारी, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे आठ वाजेपासून ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनासाठी राज्यभरातून सुमारे दोनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून दिवसभर चालणाऱ्या कविसंमेलन, साहित्य पुरस्कार वितरण, परिसंवाद, मुलाखत,  अध्यक्षिय भाषण, पुस्तक प्रकाशन व ग्रंथप्रदर्शन असे वैविध्यपूर्ण साहित्यिक उपक्रमांचा समावेश त्यात असणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष संजय गोराडे, सचिव विलास पंचभाई यांनी दिली.सदर संमेलन समर्थ मंगल कार्यालय, वसंत मार्केट, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे होणार असून संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध समीक्षक व वक्ते डॉ राहुल अशोक पाटील असणार आहेत. उद्घाटन सत्रासाठी सावानाचे वसंतराव खैरनार, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, डॉ. यशवंत पाटील, संपादक किरण लोखंडे व महेंद्र देशपांडे आदी मान्यवर उपस्थित असतील. यानंतर होणाऱ्या कविसंमेलनात राज्यभरातून ८० कवी आपल्या वैविध्यपूर्ण रचना सादर करतील. या सत्राचे सूत्रसंचालन भावना कुळकर्णी करतील.द्वितीय सत्रात डिजिटल युगातील पुस्तकांचे महत्त्व विषयावर परिसंवाद होईल. त्यात प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे, कवी विवेक उगलमुगले, संपादक घनश्याम पाटील, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील किरण सोनार आदी सहभाग नोंदवतील. संदीप देशपांडे उपस्थितांशी संवाद साधतील.तृतीय सत्रात अध्यक्षीय भाषण, पुरस्कार वितरण व विलास पंचभाई संपादित 'कणाकणातुन शब्दसरी' या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे व 'तीर्थरूप: वनवासी जीवनाची गोष्ट' या संजय गोरडे लिखित कादंबरीचे प्रकाशन होईल. डॉ. राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात जयप्रकाश जातेगावकर, डॉ. शंकर बोऱ्हाडे,  घनश्याम पाटील सहभागी होतील. सुरेखा बोऱ्हाडे सूत्रसंचालन करतील.  संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष बाळासाहेब गिरी, संदीप राक्षे, रावसाहेब जाधव, पूजा बागुल, राज शेळके, प्रा. चंद्रशेखर घुगे, संगीता फुके, नितीन गाडवे, नंदकिशोर ठोंबरे आदी प्रयत्नशील आहेत.

Share: