IMG-LOGO
राष्ट्रीय

अंतिम वर्षाच्या परीक्षांप्रकरणी सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला निकाल

Tuesday, Aug 18
IMG

युजीसीच्या निर्देशांविरोधात सुनावणी झाली असता, याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला आले.

नवी दिल्ली, दि. १८ ऑगस्ट : गेले पाच महिने कोरोना महामारीने देशासह जगभरात थैमान घातले आहे. देशात एप्रिल, मे महिन्यात परीक्षांचा हंगाम असतो. यंदा, मात्र कोरोनाचा धोका बघता व प्रतिबंध म्हणून करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे परीक्षा न घेता अंतिम वर्ष वगळता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्व राज्य सरकारांनी घेतला होता.अजूनही कोरोनाचा धोका पूर्णतः संपला नसून विद्यार्थ्यांच्या मानसिक व इतर परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्रसह इतर १३ राज्यांनी देखील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तर, युजीसीने सप्टेंबर महिन्या अखेर पर्यंत विद्यापीठांनी परीक्षा घ्यावी अशी सक्ती केली होती. त्यामुळे, विद्यार्थी हित व वाढती संभ्रमता बघता मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युवासेनेने सर्वोच्च न्यायालयात युजीसीच्या विरोधात याचिका दाखल केली होती.  आज युजीसीच्या निर्देशांविरोधात सुनावणी झाली असता, याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला आले.

Share: