IMG-LOGO
महाराष्ट्र

शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर

Wednesday, Mar 31
IMG

शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे तयार झाले होते. हे खडे जर का पित्तनलीकेमध्ये आले आणि नलिकेच्या तोंडाशी अडकले तर परिस्थिती थोडी चिंताजनक होते. पवारांच्या पित्ताशयातील एक खडा नलिकेच्या तोंडाशी अडकून बसला होता.

मुंबई, दि. ३१ मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. येथे मंगळवारी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे तयार झाले होते. हे खडे जर का पित्तनलीकेमध्ये आले आणि नलिकेच्या तोंडाशी अडकले तर परिस्थिती थोडी चिंताजनक होते. पवारांच्या पित्ताशयातील एक खडा नलिकेच्या तोंडाशी अडकून बसला होता. त्याच्यामुळे त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आम्ही उद्या शस्त्रक्रिया केली असती तर त्यांच्या स्वादूपिंडाला आणखी सूज आली असती. त्यांच्या तब्येतीवर आणखी परिणाम झाला असता. त्यांच्या पित्तनलिकेच्या आतमध्ये जाऊन तो खडा काढून. यामुळे पवार यांच्या लिव्हरवरचा दाब कमी होणार आहे. त्यांना झालेला कावीळसुद्धा कमी होईल. तसेच pancreatitis सुद्धा कमी होईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सोमवारी शरद पवारांना गॉल ब्लँडरचा त्रास होत होता. त्यावेळी पवारांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तसेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जास्त त्रास जाणवत असल्यामुळे मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पित्ताशयातील खडा यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला असून पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.ही शस्त्रक्रिया होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार हे नेते रुग्णालयात उपस्थित होते.

Share: