IMG-LOGO
मुंबई

मुंबईत आजपासून वाढणार रिक्षा, टॅक्सीचे भाडे

Monday, Mar 01
IMG

एक जूनपासून भाडे केवळ इलेक्ट्रॉनिक मीटरद्वारे आकारले जाईल. भाड्याच्या रकमेत झालेल्या या वाढीनंतर ऑटो आणि टॅक्सी शहरात प्रवास करण्याचे सर्वांत महाग साधन झाले आहे.

मुंबई, दि. १ मार्च : मुंबईत टॅक्सी आणि ऑटोचे रात्रीच्या प्रवासासाठीचे भाडे वाढणार आहे. शहरात रात्री प्रवास करण्यासाठी ऑटोमध्ये किमान 27 रुपये आणि टॅक्सीमध्ये 32 रुपये खर्च करावे लागतील. हे वाढीव या वाढीव भाडे एक मार्च ते 31 मे दरम्यान लागू राहील, अशी माहिती अधिका-यांकडून देण्यात आली आहे एक जूनपासून भाडे केवळ इलेक्ट्रॉनिक मीटरद्वारे आकारले जाईल. भाड्याच्या रकमेत झालेल्या या वाढीनंतर ऑटो आणि टॅक्सी शहरात प्रवास करण्याचे सर्वांत महाग साधन झाले आहे. एक मार्चपासून रिक्षाचे किमान भाडे 18 वरुन वाढवून 21 रुपये होणार आहे. त्याचवेळी टॅक्सीचे भाडे 22 रुपयांऐवजी 25 रुपये होणार आहे.कूल कॅबचे भाडे 28 रुपयांवरुन 33 रुपयांवर पोहोचणार आहे. रात्रीसाठीचे दरपत्रक मध्यरात्रीपासून पहाटे पाच वाजेपर्यंत लागू असेल. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील जवळपास 4.6 लाख रिक्षा आणि 60 हजार टॅक्सी रीकॅलिब्रेशनच्या प्रक्रियेतून जातील. अशात मीटर अपग्रेड करण्यासाठी सातशे रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. वरिष्ठ आरटीओ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार 0 ने संपणार्‍या रजिस्ट्रेशन नंबरच्या वाहनांचे 1 मार्च ते 7 मार्च या काळात रीकॅलिब्रेशन केले जाईल.

Share: