IMG-LOGO
राष्ट्रीय

काश्मीरमध्ये जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल

Thursday, Feb 25
IMG

जम्मू काश्मीरच्या चिनाब नदीवर स्टीलच्या पायावर उभ्या राहिलेल्या या पुलाची लांबी तब्बल 476 मीटर लांब आहे. रेल्वेमंत्र्यांनी या पुलाचा एक फोटोही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

नवी दिल्ली, दि. २५ फेब्रुवारी  : जम्मू काश्मीरमध्ये उभारल्या जाणार्‍या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून या पुलाचे काम सुरू होते. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी पायाभूत सुविधांतील ’अनन्यसाधारण रचना’ म्हणत या कामाचे कौतुक केले. जम्मू काश्मीरच्या चिनाब नदीवर स्टीलच्या पायावर उभ्या राहिलेल्या या पुलाची लांबी तब्बल 476 मीटर लांब आहे. रेल्वेमंत्र्यांनी या पुलाचा एक फोटोही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. ’इन्फ्रास्ट्रक्चर मार्बल इन मेकिंग’ असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. ’इन्फ्रास्ट्रक्चर मार्बल इन मेकिंग. भारतीय रेल्वे आणखीन एक अभियांत्रिकीचा आणखीन एक टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असेल’, असे त्यांनी म्हटले आहे. इंद्रधनुष्याच्या आकाराचा हा पूल रेल्वेच्या अतिशय महत्त्वकांक्षी प्रोजेक्टपैंकी एक आहे. काश्मीरला उर्वरित भारताच्या आणखी जवळ आणण्यासाठी हा पूल अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. या पुलाचे काम नोव्हेंबर 2017 मध्ये सुरू झाले होते. या पुलासाठी तब्बल 1250 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. हा पूल चिनाब नदीच्या तटापासून 359 मीटर उंच आणि पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरहून 35 मीटर उंच असणार आहे. तसेच या पुलाची एकूण लांबी 1315 मीटर असणार आहे.  रेल्वे अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, 8 रिश्टर स्केल इतक्या तीव्र भूकंपाच्या धक्क्याचा किंवा अती-तीव्रतेच्या स्फोटाचाही हा पूल सामना करू शकेल. यासाठी या पुलासाठी संभाव्य दहशतवादी धोका आणि भूकंप सुरक्षा प्रणालीही असेल.

Share: