IMG-LOGO
नाशिक शहर

जिल्ह्यात आजपर्यंत २९ हजार ४२१ रुग्ण कोरोनामुक्त

Tuesday, Sep 01
IMG

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २९ हजार ४२१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ७ हजार ०९३ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ८७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत २९  हजार ४२१ रुग्ण कोरोनामुक्तसद्यस्थितीत ७ हजार ०९३ रुग्णांवर उपचार सुरूनाशिक, दि. १ सप्टेंबर , २०२० (जिमाका वृत्तसेवा) :जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २९ हजार ४२१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ७ हजार ०९३ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ८७२  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ३८४, चांदवड ५५, सिन्नर ३७०, दिंडोरी ५३, निफाड ३७३, देवळा ६९,  नांदगांव २४८, येवला ७७, त्र्यंबकेश्वर १८, सुरगाणा ०६, पेठ ०६, कळवण १३,  बागलाण २१२, इगतपुरी ६६, मालेगांव ग्रामीण ३०६ असे एकूण २ हजार २५६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार १८७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६४०  तर जिल्ह्याबाहेरील १० असे एकूण ७ हजार ९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३७  हजार ३८६  रुग्ण आढळून आले आहेत.रुग्ण बरे होण्याची टक्केवारीजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७२.६७,  टक्के, नाशिक शहरात ८१.६२ टक्के, मालेगाव मध्ये  ७०.६४  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.९३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ७८.७० इतके आहे.मृत्यु :नाशिक ग्रामीण २४६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ४९१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ११२ व जिल्हा बाहेरील २३ अशा एकूण ८७२  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. लक्षणीय :◼️३७  हजार ३८६  कोरोनाबाधित रुग्णांपैकी २९  हजार ४२१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ७ हजार ९३ पॉझिटिव्ह रुग्ण.◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७८.७० टक्के

Share: