IMG-LOGO
महाराष्ट्र

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण

Tuesday, Aug 25
IMG

मागील १४ दिवसांच्या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी चाचणी करून घ्यावी अशी विनंती आयुक्तांनी केली आहे.

नागपूर, दि. २५ ऑगस्ट : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे राज्यभरात ओळखले जातात. त्यांच्या अनेक कारवायांमुळे त्यांना राजकीय मंडळी , व्यापारी, अवैध धंदे करणाऱ्या अनेक माफियांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागले असले तरी कामाची पद्धत त्यांनी कायम ठेवली असल्याचे कोरोना काळात देखील पाहायला मिळाले होते.माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला लक्षणे नसली तरी प्रोटोकॉल प्रमाणे स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे. मागील १४ दिवसांच्या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मी घरातून काम करत आहे. आपण जिंकूच!' असा विश्वास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी  यावेळी व्यक्त केला आहे.

Share: