ट्विटच्या माध्यमातून जे टीकाटिप्पणी करत आहेत, त्यांनी भान ठेवावं. 30 सप्टेंबरच्या डेडलाईनबाबत बंधन नाही.
मुंबई, दि. २८ ऑगस्ट : विद्यार्थी, पालक आणि कोविडची वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून आम्हाला परीक्षा कशा घ्यायच्या यादृष्टीने पावले उचलावी लागतील. विद्यार्थी आरोग्यहित लक्षात घेता मी सर्व विद्यापीठांमध्ये जाऊन कुलगुरु आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचे तसेच गेले अनेक महिने संभ्रमामुळ ज्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले त्याचे खापर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर फोडले आहे. तसेच, या निकालानंतर त्यांनी युवासेनाध्यक्ष व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ट्विटच्या माध्यमातून जे टीकाटिप्पणी करत आहेत, त्यांनी भान ठेवावं. 30 सप्टेंबरच्या डेडलाईनबाबत बंधन नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन याबाबत राज्याची भूमिका UGC समोर मांडेन. मन स्वच्छ ठेऊन १०० विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मत विचारावं, त्यानंतर टीका करावी. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युवा सेनेवर टीका केली जाते, अशी खरमरीत टीका यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांवर केली आहे.