IMG-LOGO
महाराष्ट्र

विष पिणार नाही, पाजणारः उदयनराजे

Thursday, Mar 11
IMG

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक परिस्थितीविषयी त्यांनी भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही राजकारण केले नाही, म्हणून स्वराज्याची स्थापना झाली.

सातारा, दि. ११ मार्च : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजामध्ये मोठी अस्वस्थता आहे. आरक्षणावरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे. आता याच मुद्द्यावर बोलताना आता मी विष पिणार नाही, आता यांना विष पाजणार अशा कठोर शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उदयनराजे यांनी राज्यातील विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी या भेटीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला; मात्र या भेटींविषयी बोलताना त्यांनी या भेटीचा काही उपयोग झाला नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारचे प्रतिनिधी न्यायलयात हजर होत नाहीत. राज्य सरकारने काय दिवे लावले ते लोकांना कळायला पाहिजे. राज्य सरकारने श्वेतपत्रिका आणावी. जगात जात नसती तर भांडण झाले नसते. सगळे एकत्र राहिले असते. ते आता एकमेकाशी बोलत नाहीत. मी अनेक नेत्यांना भेटलो; पण त्याचा उपयोग झाला नाही, असे उदयनराजे म्हणाले. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक परिस्थितीविषयी त्यांनी भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही राजकारण केले नाही, म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या रास्त आहेत. मराठा सामाजातील अनेक मुलांनी आत्महत्या केल्या. अशामुळे मराठा मुले वैफल्यग्रस्त होणार नाहीत का, असा सवाल उदयनराजे यांनी केला.

Share: