केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे संस्थापक राम विलास पासवान यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या आयसीयूत उपचार घेत आहेत.
नवी दिल्ली, दि. २१ सप्टेंबर : केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे संस्थापक राम विलास पासवान यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या आयसीयूत उपचार घेत आहेत. ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पासवान यांना रुग्णालयात राहावे लागत असल्याने त्यांनी आपले पुत्र आणि एलजेपी अध्यक्ष चिराग पासवान यांना एनडीएतील जागावाटप आणि निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवायला सांगितले आहे. मात्र गेले काही दिवस वडिलांच्या प्रकृतीच्या चिंतेमुळे चिराग हे पाटण्याला गेलेले नाहीत. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना, चिंता नको. मी लवकरच बिहारला परतेन असा संदेश पाठवला आहे.मुलगा या नात्याने मी वडिलांना रुग्णालयात पाहून खूप अस्वस्थ होतो. वडिलांनी मला बर्याच वेळा पाटण्याला जाण्याचा सल्ला दिला, पण मुलगा म्हणून त्यांना आयसीयूमध्ये सोडून कुठेही जाणे शक्य नाही. आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे, तेव्हा मी त्यांच्याबरोबर रहावे अन्यथा तुम्हा सर्वांचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वत:ला कधीही क्षमा करु शकणार नाही' असे भावनिक उद्गार चिराग पासवान यांनी काढले आहेत. (Cabinet Minister Ram vilas Paswan admitted to ICU)'पक्षाध्यक्ष या नात्याने आपल्याला त्या सहकाऱ्यांचीही चिंता आहे, ज्यांनी आपले जीवन 'बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट'साठी समर्पित केले आहे. आघाडीतील मित्रपक्षांशी बिहारच्या भवितव्याविषयी किंवा जागावाटपाबद्दल आजपर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही.' असेही चिराग यांनी स्पष्ट केले.