संस्कृत भाषा सभा, नाशिक तसेच संस्कृत भाषा प्रसार कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
नाशिक, दि. ३ जुलै : येथील शासकीय माध्यमिक कन्या शाळा येथील सेवानिवृत्त शिक्षिका उषा मोहन गोरवाडकर यांचे दिनांक ३ जुलै रोजी वृद्धापकाळाने ८१ व्या वर्षी निधन झाले. त्या प्रख्यात विधिज्ञ मोहन वासुदेव गोरवाडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा अॅड. नागनाथ मोहन गोरवाडकर, मुलगी अॅड. तुळजा गिरीश देशमुख, सून,जावई, नातवंडे असा परिवार आहे.त्या विद्यार्थिनीप्रिय शिक्षिका होत्या. संस्कृत व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देखील देण्यात आलेला होता. संस्कृत भाषा सभा, नाशिक तसेच संस्कृत भाषा प्रसार कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्यावर नाशिक अमरधाम येथे कोव्हिड नियमांनुसार मोजक्या नातेवाईकांच्या व मित्र परिवाराच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.