नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मधल्या काळात थोडी फाटाफूट झाली होती. इकडे तिकडे झालं होतं.
नाशिक, मुंबई, दि. ८ जानेवारी : नाशिकमधील भाजपाचे वरिष्ठ नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या दोन्ही नेत्यांनी हाती शिवबंधन बांधले.नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मधल्या काळात थोडी फाटाफूट झाली होती. इकडे तिकडे झालं होतं. पण आता ही जुनी-नवी मंडळी एकत्र आल्यानंतर नाशिकवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आमचे कौटुंबीक संबंध आहेत. एखाद्या भेटीने राजकीय परिस्थितीवर परिणाम होत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच राज्यात मोठे प्रकल्प येत आहेत. त्यात रस्त्याचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात काही स्पीड ब्रेकर आहेत. त्यावर गडकरींशी चर्चा केली असून हे स्पीड ब्रेकर लवकरच दूर होतील, असंही ते म्हणाले. केवळ निवडणूक आले म्हणून गीते, बागूल यांनी पक्षप्रवेश केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.