IMG-LOGO
महाराष्ट्र

राज्यात पाऊस पडण्याचा इशारा

Monday, Jan 04
IMG

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेतला गारवा कमी झाला.

मुंबई, दि. ४ जानेवारी : हवामान खात्याच्या अंदाजामुळे बळीराजाची धाकधूक आणखी वाढली आहे. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेतला गारवा कमी झाला. अशा अवेळी पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला आहे. हेच वातावरण पुढचे काही दिवस राहणार आहे. अहमदनगर शहरातही हलक्या पावसाने हजेरी लावली. राज्यात सहा-सात जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्रातील किमान तापमानात येत्या तीन-चार दिवसांत घट होण्याची शक्यता आहे.आज मुंबई, नवी मुंबई, सांताक्रुझ परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी दिल्लीत हलक्या सरींचा पाऊस झाला. पावसामुळे दिल्लीत धुके नाही; परंतु थंडी वाढली आहे. दिल्लीत पहाटे 11.30 ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पाऊस पडला. सततच्या ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक कांद्याचे रोप खराब झाले, तर लागवड केलेला उन्हाळ कांद्यावर मावा, करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला असून मोठ्या प्रमाणावर कांदे मरत आहेत. कांद्यावर केलेला खर्चही निघणार नसल्याने अखेरीस नाशिक देवळा तालुक्यातील खामखेडा येथील शेतकरी समाधान आहेर यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रात नुकतीच लागवड केलेल्या कांदा पिकात मेंढ्या सोडून आपला संताप व्यक्त केला आहे. 

Share: