एकरांहून अधिक जमीन पाण्यामुळे खरडली गेली आणि काही शेतकर्यांनी पेरणी केलेले बियाणे काही ठिकाणी वाया गेले.
अमरावती, दि. १२ जून : धामणगाव रेल्वे तालुक्यातील 17 गावातून गेलेल्या समृद्धी महामार्गाच्या लगतच्या शेतातून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याचे काम ठेकेदाराने थातुरमातुर केल्याने गुरुवारी झालेल्या पावसामुळे शेतात पाणी तुंबले आहे. सर्वांत जास्त फटका वाढोना, शेंदूरजना, आसेगाव या तीन गावातील शेतकर्यांना बसला आहे. पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नाही. त्यामुळे पावसाला सुरुवात होताच शेतकर्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. शेतशिवारात नुसते पाणीच पाणीच दिसून येत असून एक हजार एकरांहून अधिक जमीन पाण्यामुळे खरडली गेली आणि काही शेतकर्यांनी पेरणी केलेले बियाणे काही ठिकाणी वाया गेले.