IMG-LOGO
महाराष्ट्र

माघ एकादशीची पूजा भाविकाविना

Tuesday, Feb 23
IMG

रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या उपस्थित झाली. या वेळी मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे, मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पंढरपूर, दि. २३ फेब्रुवारी  : राज्यभर कोरोनाचे संकट सुरू असताना आज माघ शुद्ध एकादशीचा सोहळा संचारबंदीत झाला. विठुरायाची महापूजा मंदिर समितीच्या सदस्य अ‍ॅड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली. पंचामृत स्नान आणि मंत्रोच्चारात देवाची षोडशोपचारे पूजा करण्यात आली. रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या उपस्थित झाली. या वेळी मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे, मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विठुराया आणि रुक्मिणी मातेची महापूजा पार पाडतामा कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. दोन्ही गाभा-यात केवळ पाच जणांना प्रवेश देण्यात आला होता. जया एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला अतिशय वेगळी आणि आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. विठुराया गरुडावर उभा आहे, तर रुक्मिणी माता श्रीफळरुपी कमळ पाकळ्यात उभी असल्याचे रूप फुल सजावटीमधून दाखवून देण्यात आले आहे. पुण्यातील भाविक सचिन चव्हाण, संदीप पोकळे आणि युवराज सोनार यांनी ही संकल्पना फुल सजावटीतुन साकारली. विठ्ठल हा विष्णूचा अवतार आणि विष्णूचे वाहन गरुड असल्याने विठुराया गरुडावर उभा असल्याची अफलातून कल्पना फुल सजावटीतून साकारण्यात आली आहे. ही फुलांची सजावट करताना झेंडू, शेवंती, ग्लॅडीओ, ऑर्केड, ब्ल्यू डीजे, संगोप आणि ड्रेसिना या फुलांच्या रंगसंगतीचा वापर केला आहे. आजवर विठ्ठल मंदिराला अनेक प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली असली, तरी आजची सजावट वेगळी आणि खास होती.

Share: