सामन्याच्या सुरुवातीला घियासीने आघाडी घेतली. पहिल्या डावानंतर बजरंग पुनिया 0-1 ने पिछाडीवर होता.
टोकियो, दि. ६ ऑगस्ट : बजरंग पुनियाने जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं. किर्गीस्तानच्या कुस्तीपटूचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळलेल्या बजरंगचा इराणचा कुस्तीपटू आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या मोर्तेजा घियासी यांच्यासोबत लढत झाली. सामन्याच्या सुरुवातीलाच घियासीने आघाडी घेतल्यानं भारतीयांचा श्वास रोखला गेला. मात्र, शेवटच्या काही क्षणात बजरंगने चपखलपणे घियासीला चितपट केलं आणि सामना आपल्या नावे केला. या विजयाबरोबरच बजरंग पुनियाने उपांत्य फेरीत धडक मारली.सामन्याच्या सुरुवातीला घियासीने आघाडी घेतली. पहिल्या डावानंतर बजरंग पुनिया 0-1 ने पिछाडीवर होता. मात्र, दुसऱ्या डावात पुनियाने पुनरागमन करत शेवटच्या काही क्षणात उत्कृष्ट डाव दाखवत घियासीला 2-1 ने धोबीपछाड केले. त्याआधी पुनिया किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमतालीएवचा (E Akmataliev) या पैलवानाला नमवून उपांत्यपूर्व फेरीत आला होता.