IMG-LOGO
राष्ट्रीय

असा धडा देऊ... भविष्यात उदाहरण प्रस्तुत होईल, योगी आदित्यनाथ यांची ग्वाही

Friday, Oct 02
IMG

हाथरस लैगिक अत्याचार आणि खून प्रकरणावर योगी यांनी प्रथमच ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

लखनऊ दि. ०२ ऑक्टोबर : महिलांची सुरक्षा हा आपल्या सरकारचा संकल्प असून माता-भगिनींच्या सन्मानाला ठेच पोहोचविणाऱ्यांना असा धडा देऊ... भविष्यात उदाहरण प्रस्तुत होईल, असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्वाही दिली आहे. हाथरस लैगिक अत्याचार आणि खून प्रकरणावर योगी यांनी प्रथमच ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे, उत्तर प्रदेशातील माता-भगिनीच्या सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचविण्याचा विचार सुद्धा करणाऱ्यांचा सत्यानाश होईल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

Share: