IMG-LOGO
शिक्षण

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतची सुनावणी लांबणीवर

Friday, Aug 14
IMG

दिल्ली, दि. १४ ऑगस्ट : अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेना यासोबतच काही विद्यार्थ्यांकडून याचिका दाखळ करण्यात आली आहे. या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. आज या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. मात्र ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात 18 ऑगस्ट रोजी केली जाणार आहे. आजच्या सुनावणीत सगळे युक्तिवाद एकाच बाजूचे होते. पुढील सुनावणी यूजीसीची बाजू येणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात विद्यार्थ्यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आले. यश दुबे या विद्यार्थ्याच्या बाजूने बोलताना अभिषेक मनु सिंघवी यांनी काही युक्तिवाद केले. ते म्हणाले की, सध्या सर्व विद्यार्थी हे परगावी अडकलेले आहेत. ते परिक्षेला कसे पोहोचू शकतील? यासोबतच सध्या सार्वजनिक वाहतूक बंद आहे.

Share: