IMG-LOGO
नाशिक शहर

आजोबा- नातूमधील वाद संवादात आम्ही काय बोलावं : फडणवीस

Thursday, Aug 13
IMG

मुंबई, दि. १३ ऑगस्ट :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझा नातू पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत फटकारलं. यावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.आता आजोबा आणि नातूमधील वाद, संवाद, विवाद जे काही असेल त्यात आम्ही काय बोलावं.हा त्यांच्या घरचा प्रश्न आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे किंवा नातवाने आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवाने ठरवायचं आहे. त्यासंदर्भात मी बोलणं योग्य ठरणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Share: