IMG-LOGO
महाराष्ट्र

…तर ते सरकार ८० तासांचं ठरलं नसतं; चंद्रकांत पाटलांनी काढला अजित पवारांना चिमटा

Friday, Dec 18
IMG

अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर ८० तासांचे सरकार आले त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते. त्यांच्या आमदारांना त्यांनी सांभाळलं असतं तर सरकार टिकले असते', असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

मुंबई, दि. १८ डिसेंबर :  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे. अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. चंद्रकांत पाटील साईबाबाच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी टोला लगावला आहे.'भाजपमधले काही आमदार नाराज आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या दाव्यावर तुमचं आघाडी सरकार उत्तम चाललंय, आमच्या लोकांना कशाला आकर्षित करता?, असं पाटील म्हणाले. अजितदादा खूप ‌चांगले नेते आहेत. चांगलं काम करतात. गंमत निर्माण होईल अस बोललं तर त्यांची प्रतिष्ठा कमी होईल', असा टोला त्यांनी यावेळी लगावला.'भाजपचे आमदार नाराज असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तसंच राष्ट्रवादीत लवकरच मोठी महाभरती होणार असल्याचा दावा ते करत आहेत. यावर तुम्ही सरकार चालवा आम्ही विरोधी पक्ष सांभाळू', असं पाटील म्हणाले. अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर ८० तासांचे सरकार आले त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते. त्यांच्या आमदारांना त्यांनी सांभाळलं असतं तर सरकार टिकले असते', असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Share: