IMG-LOGO
महाराष्ट्र

मोठा निर्णय ! लोकवस्त्यांची जातीवाचक नावं हद्दपार होणार

Wednesday, Dec 02
IMG

शहरातील विविध जातीवाचक वस्त्यांची नावं हद्दपार करून त्यांना महापुरुषांची नावं दिली जाणार आहेत. वस्त्यांना दिलेली जातीवाचक नावं योग्य नसल्याचं मत काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं.

मुंबई, दि.२ डिसेंबर : महाविकास आघाडी सरकारने बुधवारी (2 डिसेंबरला) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाड्यावस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कुभारवाडा, चांभारपुरा, सुतारगल्ली, ब्राम्हणआळी, ही वस्त्यांची नावं महाराष्ट्रात फिरताना अनेक शहरं आणि गावांमध्ये सहज दिसून येतात. वर्षानुवर्षं ही नावं त्या त्या भागाची ओळख म्हणून राहिली आहेत. पण वस्त्यांच्या या नावांवरूनच या वाड्यावस्त्यांमध्ये कोण रहातं याची ओळख होते. सामाजिक न्याय विभागानं यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे.शहरातील विविध जातीवाचक वस्त्यांची नावं हद्दपार करून त्यांना महापुरुषांची नावं दिली जाणार आहेत. वस्त्यांना दिलेली जातीवाचक नावं योग्य नसल्याचं मत काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं.  या निर्णयामुळे राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व शहरं आणि ग्रामीण भागात वस्त्यांची जातीवाचक नावं बदलून त्या वस्त्यांना महापुरूषांची नावं देण्यात येतील," असं मुंडे म्हणाले. यापुढे महाराष्ट्रात कोणतेही शहर किंवा ग्रामीण भागात वस्त्यांना जातीवाचक नावे नसतील, पूर्वीची जातीवाचक नावे बदलून त्यांना समता नगर, क्रांतीनगर अशी किंवा महापुरुषांची नावे देण्यात येतील; राष्ट्रीय एकात्मतेस वृद्धिंगत करणारा हा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत महाविकास आघाडी सरकारने घेतला. अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

Share: