आरोग्य सुविधा आम्ही वाढवत आहोत. पण आम्हाला दररोज 50 डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी राज्यभर उपलब्ध होतील अशी सोय करुन द्या.
मुंबई, दि. २ एप्रिल : परिस्थिती अशीच राहिली, असे मी म्हणालो होतो. तर आपल्याला लॉकडाऊन लागू करावा लागतो की काय, अशी शक्यता होत आहे. आजही ती परिस्थिती कायम आहे. मधल्या काळात आपण शिथिल झालो, लग्नसमारंभ, पार्ट्या, राजकीय मोर्चे, आंदोलनं सुरू झाले. कोरोना गेला, अशा रितीने सगळे सुरू होते. दुर्दैवाने जी भिती सगळे तज्ज्ञ व्यक्त करत होते, ती खरी ठरली. गेल्या वेळेपेक्षाही आक्राळ विक्राळ रुप मार्चमध्ये धारण करून कोरोना आला आहे. हा कोरोना आपली परीक्षा बघत आहे. पण यावेळी आपल्याला धैर्याने एकत्र लढण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी जगातील परिस्थितीची माहिती वाचून दाखवली. ब्राझील, फ्रान्स, बल्गेरिया, रशिया मधल्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी देत. तिथं लादण्यात आलेल्या कठोर निर्बंध आणि लॉकडाऊनची सविस्तर माहिती यावेळी दिली. "देशाबाहेर कोरोनाची स्थिती भयंकर होत चालली आहे. अनेक ठिकाणी आजही लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादलेले आहेत. पण आपण राज्यातील जनतेचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन अद्याप तरी लॉकडाऊन केलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी कोरोनाचं राजकारण करू नये. उलट त्यांनी राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांसाठी मदत करण्याची भूमिका घ्यावी", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.लॉकडाऊन नको त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर सरकारने भर द्यावा असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं होतं. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "आरोग्य सुविधा आम्ही वाढवत आहोत. पण आम्हाला दररोज 50 डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी राज्यभर उपलब्ध होतील अशी सोय करुन द्या. आरोग्य सुविधा म्हणजे फर्निचरचं दुकानं नाही. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांची आवश्यकता असते."सरकारकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या लॉकडाऊनच्या इशाऱ्यावर काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रीया नोंदवली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, "उद्धवजी, अडचण अशी आहे की लॉकडाऊनमुळं फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. लॉकडाऊन मूलत: रुग्णालयं, आरोग्य सुविधा उभारणीसाठी होतं. आता आरोग्य सेवा उभारणीवर आणि मृत्यदर कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करुया.