२०१४ला ते नसतानाही सत्ता आलीच होती. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक पक्षात, पक्षविस्तार होतच असतं,' असं म्हणत पक्षांतर केलेल्या नेत्याबाबत फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
नाशिक, दि. १३ जानेवारी : धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे.नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानेही त्या कबुलीसंदर्भात विचार करणे आवश्यक आहे. यातील कायदेशीर बाब, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी या दोघांनीही मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे, असे संशयाचे वातावरण राहणे योग्य नाही. पोलिसांनी या संदर्भातील सत्य तत्काळ बाहेर आणावे. एकदा सत्य बाहेर आले की, आम्ही आमची मागणी करू”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. जे दुसऱ्या पक्षात गेले ते वाईट असं म्हणणार नाही. अजूनही काही परत पक्षात येण्याच्या वाटेवर आहेत. २०१४ला ते नसतानाही सत्ता आलीच होती. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक पक्षात, पक्षविस्तार होतच असतं,' असं म्हणत पक्षांतर केलेल्या नेत्याबाबत फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.