IMG-LOGO
महाराष्ट्र

हिटलर सत्तेत आल्यावर त्यानेही मोठं स्टेडियम बनवून स्वत:चचं नाव दिलं

Wednesday, Feb 24
IMG

राष्ट्रवादी चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्वीट करून मोदींची तुलना हिटलरशी केली आहे.

मुंबई, दि. २४ फेब्रुवारी : सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच्या नावावरुन विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींवर जबरी टीका केलीय.राष्ट्रवादी चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्वीट करून मोदींची तुलना हिटलरशी केली आहे. 'स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले… हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते.' असे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे.' सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम म्हणजेच मोटेरा स्टेडियमला देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांचे नाव देण्यात आले आहे. मोटेरा स्टेडियमचे नामांतर करून नरेंद्र मोदी स्टेडियम असे नाव देण्यात आले आहे. देशभरातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमला आता नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणून ओळखले जाणार आहे.

Share: