IMG-LOGO
नाशिक शहर

शेवटच्या दिवसाच्या प्रचारावर नाशिकमध्ये पावसाचे सावट

Saturday, Oct 19
IMG

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नाशिक शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. परिणामी शेवटच्या काही शिल्लक तासांच्या प्रचारावर पावसाचे सावट पडण्याची शक्यता आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास  शिल्लक असताना नाशिक शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. परिणामी शेवटच्या काही शिल्लक तासांच्या प्रचारावर पावसाचे सावट पडण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आल्या, मात्र दुपारनंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने अनेकांना शेवटच्या दिवशी प्रचार करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांची चांगलीच तारंांबळ उडाली. परिणामी पावसामुळे प्रचाराला अडथळे निर्माण झाल्याचे चित्र होते.परतीच्या पावसाने राज्यातून काढता पाय घेतला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले असले, तरी अजूनही पावसाचा मुक्काम काही भागांत असून तो नोव्हेंबरपर्यंत पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांच्या हवाल्याने कालच 18 ऑक्टोबर रोजी लोकशाही आघाडीने वर्तविला होता. आज तो तंतोतंत खरा ठरला.दरम्यान आज 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचाराची सांगता होणार असून परवा म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल हाती येईल. या निवडणूकीत साधारणत: 9 कोटी मतदार राज्यातील सुमारे 3 लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्रांमधून मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी सुमारे 3 लाख पोलिस कर्मचारी बंदोबस्त व सुरक्षेसाठी तैनात आहेत.

Share: