IMG-LOGO
मनोरंजन

यकृताच्या समस्येमुळे अभिताभ बच्चन रुग्णालयात

Friday, Oct 18
IMG

बॉलीवूडचे सुपरस्टार व ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यकृताच्या त्रासामुळे रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.

 सुमारे तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास त्यांना यकृताचा त्रास होत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र याची माहिती कुणालाही देण्यात आलेली नव्हती.मुंबईतील एका रुग्णालयात विशेष दालनात त्यांच्यावर उपचार सुरू असून अजूनपर्यंत कुणीही त्यांना भेटलेले नाही. नुकतेच 77व्या वर्षात पदार्पण केलेल्या अमिताभ बच्चन यांना कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला होता. त्यानंतर हॅपीटायटीस बी ही झाल्याने त्यांच्या यकृतावर परिणाम झाला. सध्या त्यांचे यकृत केवळ 25 टक्के काम करत असल्याचे त्यांनीच एकदा सांगितले होते. गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉ. बारवे त्यांच्यावर उपचार करत असल्याचे समजते. जंजीर, दीवार, शोले, शहंशाह यासारख्या चित्रपटातून ॲँग्री यंग मॅनची भूमिका केलेल्या श्री बच्चन यांनी अलिकडच्या काळात टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती या मालिकेचे सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. वयाच्या पंचाहत्तरीतही ते कार्यरत असून अलिकडेच त्यांचा एक दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Share: