IMG-LOGO
नाशिक ग्रामीण

येवल्यात सायगावमध्ये सरकार विरोधात शेतकऱ्यांची एल्गार परिषद

Friday, Nov 01
IMG

मागील वर्षाचा कोरडा दुष्काळ आणि चालु हंगामात परतीच्या पावसाने शेत पिकांची झालेली धुळधान यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने, सायगावमधील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला.

पिक नुकसान भरपाई सह कर्जमाफीची मागणी सायगावमध्ये सरकार विरोधात शेतकऱ्यांची एल्गार परिषद येवला : मागील वर्षाचा कोरडा दुष्काळ आणि चालु हंगामात परतीच्या पावसाने शेत पिकांची झालेली धुळधान यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने, सायगावमधील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला. शुक्रवार दि १ नोहेंबर रोजी सकाळी ९ वा रोकडोबा पारावर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारच्या धोरणावर टिका करत एल्गार परिषद भरवली. किसान क्रांती एल्गार परिषदेचे आयोजक प्रा. शिवाजी भालेराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे, छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय सोमासे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब आहरे, शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव खैरनार,राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे युवा नेते शरद लोहकरे,माजी सरपंच गणपत खैरनार, दिनेश खैरनार, अँड. राहूल भालेराव विलास भालेराव आदीनी परिषदेत आपली भूमिका मांडली. निवडणुका संपल्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहे. मात्र राज्यातल्या शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती अस्मानी - सुलतानी संकटांचा फास आवळला जात आहे. सेना भाजपा सरकारची फसवी कर्जमाफी, मागील वर्षीच्या दुष्काळी अनुदानापासून वंचित राहिलेला शेतकरी, ३ वर्षापासून पिककर्जाचे वाटप नाही. नजिल्हा बँकेचे ठप्प झालेले व्यवहार यामुळे शेतकरी उद्वस्त झाला आहे. परतिच्या पावसाने हातातोंडाशी आलेले कपाशी, मका, सॉयाबिन, लाल कांदा, आदी पिकाचे नुकसान झाले आहे. मागील दोन हंगामात शेतकऱ्यांनी सोने तारण ठेवून पिके उभी केली. मात्र गेल्या वर्षीचा कोरडा आणि यंदाचा ओला दुष्काळाने शेतकरी देशोधडीला लागला. तरीही सरकार लक्ष द्यायला तयार नसल्याचा सूर एल्गार परिषदेतुन शेतकऱ्यांनी बोलुन दाखवला. एल्गार परिषदेने पुढील ठराव मांडले राज्यात ओला दुष्काळ जाहिर करून हेक्टरी ५० हजार रूपये अनुदान द्यावे. पिक विम्याची अट रद्द करून सर्वांना लाभ मिळावा. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी. सक्तीची कर्ज वसुली व मालमत्तेची जप्ती थांबवावी. जिल्हा बँकेचा आर्थिक व्यवहार तात्काळ सुरू करावा. नादुरुस्त रोहत्राच्या ठिकाणी ४८ तासात नविन रोहित्र मिळावा. बँक, पतसंस्थेकडून सोने गहाण लिलाव करू नहे.आदी. ठराव करण्यात आले. ह्या एल्गार परिषदेचे आयोजन येवला तालुक्यातील धुळगाव, पाटोदा, नगरसूल, मुखेड, पाटोदा, अंदरसूल, राजापूर आदी. प्रमुख गावातुन करण्यात येणार आहे.तालुका भर जनजागृती झाल्यानंतर येवला तहसिल,पांत कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे आयोजक प्रा. शिवाजी भालेराव, संजय सोमासे, श्रावण देवरे यांनी दिली.

Share: