झी युवा वाहिनीवर ऐन दिवाळी मध्ये सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रात्री ८:३० वाजता येणारी नवीन मालिका प्रेम पॉयजन पंगा च्या सेट वर सुद्धा दिवाळी सणाची जय्यत तयारी दिसली . मात्र सगळ्यात लक्ष वेधून घेणारा होता तो म्हणजे प्रेम पॉयजन पंगाच्या फोटोज नी बनवलेला आकाश कंदील !!
प्रेम पॉयजन पंगा च्या कलाकारांनी दिवाळीशूटसाठी बनवला आकाश कंदील !!दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. झी युवा वाहिनीवर ऐन दिवाळी मध्ये सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रात्री ८:३० वाजता येणारी नवीन मालिका प्रेम पॉयजन पंगा च्या सेट वर सुद्धा दिवाळी सणाची जय्यत तयारी दिसली . मात्र सगळ्यात लक्ष वेधून घेणारा होता तो म्हणजे प्रेम पॉयजन पंगाच्या फोटोज नी बनवलेला आकाश कंदील !! गेली दोन महिने झी युवा आणि कोठारे व्हिजन या नवीन मालिकेवर काम करत आहे.झी युवा इच्छाधारी नागीण अशी एक वेगळी आणि मराठी इंडस्ट्री साठी पूर्णपणे नवीन गोष्ट घेऊन येत असल्याने कोठारे व्हिजन चे आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे जातीने या कार्यक्रमाच्या जडणघडणेत सक्रिय होऊन काम बघत होते. या दोघांनी किंवा सेट वर कोणत्याही कलाकारांनी गेली दोन महिने कसलीच सुट्टी घेतली नव्हती. मात्र दिवाळी आणि कार्यक्रम सुरू होण्याआधी सर्वानीच एक दिवसाची सुट्टी घेतली आणि परत सेटवर दिवाळी साजरी करण्यासाठी जमले . कार्यक्रमाचे नवीन कलाकार जोडी करण बेंद्रे आणि शरयू सोनवणे या दोघांनी मिळून शोचा फोटो असलेला आकाशकंदील बनवला. याबद्दल मालिकेची नागीण जुई म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनवणे ला विचारले असता ती म्हणाली "आम्ही सगळ्यांनी प्रेम पॉयजन पंगा साठी भरपूर मेहनत घेतली आहे . ऐन दिवाळी मध्ये शो सुरू होत असल्याने असा एखादा आकाश कंदील आमच्या सेटच्या घरावर असावा असे वाटले म्हणून मी आणि करण दोघांनी मिळुन हा आकाश कंदील बनवला . ज्या प्रमाणे हा आकाश कंदील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे तसाच आमचा कार्यक्रम सुद्धा सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल अशी आशा करते "