IMG-LOGO
नाशिक शहर

पाच हजार नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चव

Tuesday, Oct 15
IMG

आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या रसायनविरहीत विषमुक्त भाज्यांची ओळख शहरातील नागरिकांना व्हावी म्हणून सोशल नेटवर्कींग फोरमच्या वतीने नाशिक येथील कुसूमाग्रज प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

पाच हजार नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवसोशल नेटवर्कींग फोरमचा उपक्रम                                                  नाशिक  : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या रसायनविरहीत विषमुक्त भाज्यांची ओळख शहरातील नागरिकांना व्हावी म्हणून सोशल नेटवर्कींग फोरमच्या वतीने  नाशिक येथील कुसूमाग्रज प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.आदिवासी भगिनींनी रानातून गोळा केलेल्या जीवनसत्व, लोह, कॅल्शियमनी भरपूर युक्त भाज्या, फळे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. शहरी भागातील जनतेने ज्या भाज्यांची  नावेही ऐकली नाहीत अशा चाईचा मोह, मेका, कचरडा, जोथा, चीचूरडे, करटूले, लोथी यासारख्या अनेक पौष्टीक भाज्या, त्यांची बनवण्याची पद्धत आणि प्रत्यक्ष तयार केलेल्या भाज्यांची नाशिककरांनी चव घेतली.        विषारी औषधांनी युक्त भाज्यांच्या भडिमारामुळे जगभरातील लोकांना मधूमेह, रक्तदाब, कॅन्सर अशा असाध्य आजारांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण-आदिवासी भागात नैर्सर्गिकरित्या येणाऱ्या रानभाज्यांचे महत्व लक्षात घेणे अत्यावश्यक बनले आहे. हे महत्व शहरी लोकांना कळून आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षे सेवन केलेल्या भाज्यांचा पुनर्वापर सुरु करण्यासाठी  प्रयत्न सोशल नेटवर्किंग फोरम करत आहे.   यापुढे या रानभाज्या नियमीत विक्री केंद्र सुरू करण्याचा फोरमचा प्रयत्न आहे.  यावेळी सौ. प्रतिभा होळकर, सौ. प्रतिभा पाटिल(मुद्रा मराठा महिला मंडळ) ,डाॅ. जोत्स्ना पवार, सौ. सरोज भायभंग(इनरव्हील क्लब, नाशिक मेन) सौ. अश्विनी न्याहारकर* (Wow women of wisdom mahila mandal) सौ. एस.व्ही सोनवणे* (पर्यवेक्षिका- सापगाव, काचुर्ली, तळेगाव केंद्र.)  सौ. सुशिला भदाणे, सौ. सुमती पवार सौ. विजया सोनवणे* (सदस्या, सोशल नेटवर्कींग फोरम) डाॅ.प्रशांत देवरे* (अध्यक्ष, आयएमए, नाशिक) अॅड. विलास लोणारी, श्री. मकरंद हिंगणे, श्री. लोकेश शेवडे* (कुसूमाग्रज प्रतिष्ठान)श्री. प्रकाश गांगुर्डे सरपंच काचूर्ली  आदी मान्यवर उपस्थित होते         कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक  व अंगणवाडी सेविका, सापगाव, काचुर्ली, तळेगाव केंद्र. * इंडीयन मेडीकल असोसीएशन, नाशिक शाखा* मुद्रा मराठा महिला मंडळ* दिशा संकल्प फाऊंडेशन* कुसूमाग्रज प्रतिष्ठान* इनव्हर क्लब नाशिक मेन* वूमन ऑफ विस्डम माहिला मंडळ यांनी सहकार्य केले.       संकल्पना आणि आयोजक            सोशल नेटवर्किंग फोरम, नाशिक                 सोशल नेटवर्किंगफोरम टीमप्रमोद गायकवाड, अध्यक्ष,डॉ.पंकज भदाणे,जीवन सोनवणे,प्रशांत बच्छाव, रामदास शिंदे, विजय भरसट,

Share: