भारत निवडूनक आयोगाने जाहीर केलेल्या राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान इजा झाल्यास अथवा आजारी पडल्यास तातडीने निःशुल्क औषधोपचार मिळणार.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्यास औषधोपचार मिळणार निःशुल्क मुंबई दि.१८ l भारत निवडूनक आयोगाने जाहीर केलेल्या राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान इजा झाल्यास अथवा आजारी पडल्यास तातडीने निःशुल्क औषधोपचार मिळणार. आगामी येऊ घातलेल्या राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुका येत्या एकवीस तारखेला होणार असून या निवडणुकीसाठी नियुक्त असलेल्या शासकीय, निमशासकीय, अधिकारी व कर्मचारी ,पोलीस,केंद्रीय निमलष्करी दलाचे कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान इजा झाल्यास अथवा आजारी पडल्यास त्यांना तातडीने निःशुल्क आरोग्य तपासणी, चाचणी ,औषध व उपचार सेवा पुरविण्याची व्यवस्था करण्यात येईल , ज्या भागात आवश्यक ती सुविधा उपलब्ध नसल्यास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नित खाजगी रुग्णालयात सेवा देण्यात येईल सदर रुग्णालयात पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्याचे शल्य चिकित्सक यांच्या सहमतीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुविधा देण्याची व्यवस्था केली जाईल दरम्यान खाजगी रुग्णालयात आलेला खर्चाची पूर्तता शासनामार्फत करण्यात येईल असा आदेश महाराष्ट्र राज्याचे अवर सचिव यांच्या डिजिटल स्वाक्षरीने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.सदर सुविधा हि निवडणूक निकाल लागेपर्यंत केलेल्या उपचारावर लागू राहील.