IMG-LOGO
COVID-19

जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार १४७ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज; सद्यस्थितीत २ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरू

Saturday, Jul 25
IMG

जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार १४७ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज; सद्यस्थितीत २ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरू नाशिक, दि. २५ जुलै , २०२० (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ८ हजार १४७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २०८, चांदवड २४, सिन्नर १२४, दिंडोरी ५३, निफाड १७५, देवळा २१, नांदगांव ६६, येवला ४०, त्र्यंबकेश्वर १५, सुरगाणा १५, पेठ ०३, कळवण ००, बागलाण ३६, इगतपुरी १५८, मालेगांव ग्रामीण ४१ असे एकूण ९७९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६७७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८३ तर जिल्ह्याबाहेरील ०७ असे एकूण २ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ११ हजार ३३२ रुग्ण आढळून आले आहेत. मृत्यु : नाशिक ग्रामीण १०२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २३४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४ व जिल्हा बाहेरील १९ अशा एकूण ४३९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. लक्षणीय : ◼️११ हजार ३३२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ८ हजार १४७ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज. ◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ७४६ पॉझिटिव्ह रुग्ण. (वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

जिल्ह्यात आजपर्यंत ८  हजार १४७  कोरोना रुग्णांना डिस्चार्ज;सद्यस्थितीत २ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरू नाशिक, दि. २५  जुलै , २०२० (जिमाका वृत्तसेवा) :जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ८ हजार १४७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक २०८, चांदवड २४, सिन्नर १२४, दिंडोरी ५३, निफाड १७५, देवळा २१,  नांदगांव ६६, येवला ४०, त्र्यंबकेश्वर १५, सुरगाणा १५, पेठ ०३, कळवण ००,  बागलाण ३६, इगतपुरी १५८, मालेगांव ग्रामीण ४१ असे एकूण   ९७९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६७७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८३  तर जिल्ह्याबाहेरील ०७  असे एकूण २ हजार ७४६  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ११  हजार ३३२ रुग्ण आढळून आले आहेत.मृत्यु :नाशिक ग्रामीण १०२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २३४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४  व जिल्हा बाहेरील १९ अशा एकूण ४३९  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. लक्षणीय :◼️११ हजार ३३२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ८ हजार  १४७  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ७४६  पॉझिटिव्ह रुग्ण.(वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Share: