IMG-LOGO
महाराष्ट्र

परत एकदा समुद्रसौंदर्याने बहरलेलं कारवार मुंबईकरांच्या भेटीला

Wednesday, Nov 06
IMG

हॉटेल कोहिनूर कॉंटिनेंटलमधील ६ नोव्हेंबरपासून अवतरणार सुंदर समुद्रकिनाऱ्यांचं कारवार –'कारवारी फूड फेस्टिव्हल' मध्ये.

हॉटेल कोहिनूर कॉंटिनेंटलमधील ६ नोव्हेंबरपासून अवतरणार सुंदर समुद्रकिनाऱ्यांचं कारवार –'कारवारी फूड फेस्टिव्हल' मध्ये. मुंबई : मुंबईतील अंधेरीस्थित कोहिनूर कॉंटिनेंटलमधील 'सॉलिटेअर रेस्टॉरंट'मध्ये शुक्रवार दि. ६ नोव्हेंबरपासून बारा दिवसांचा कारवारी खाद्यमहोत्सव सुरू होत असून, यामध्ये कारवारी मास्टरशेफने स्वतः तयार केलेल्या कारवारी खाद्यसंस्कृतीची चव खवय्यांना चाखता येणार आहे. या महोत्सवात, प्रत्येक दिवशी सुमारे ४० विविध खाद्यपदार्थ उपलब्ध असतील व मेन कोर्समध्ये दर दिवशी नवीन कारवारी पदार्थांचा समावेश असेल. कारवार म्हटलं की आठवतो तो सुंदर सागरिकिनारा, त्यामुळे या महोत्सवाची सजावटही सागरकिनाऱ्यावर बेतलेली आहे. समुद्र, वाळू, शंखशिंपले अशा वातावरणात बसून चविष्ट कारवारी भोजनाचा आस्वाद घेण्याचा अनुभव हा महोत्सव देणार आहे. इतकंच काय, पण रेस्टॉरंटमधले वाढपे सुद्धा पारंपरिक कारवारी वेशातच पदार्थ वाढतील कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमेवरील एक सुंदर प्रभाग म्हणजे कारवार. भात आणि मासे हे येथील मुख्य अन्न असले तरी येथील विविध प्रकारच्या करी आणि उपकरी निश्चितच चाखाव्यात अशा असतात. कारवारच्या विविधरंगी निसर्गाप्रमाणेच इथल्या भूमीत मुरलेल्या खाद्यसंस्कृतीतील पदार्थांच्या चवीही नाना प्रकारच्या मासाल्यांनी परिपूर्ण असतात. कारवारी पदार्थांची खरी ओळख म्हणजे साधे पण झणझणीत, रस्सेदार खाद्यपदार्थ. नारळ, भात आणि मासे या तीन पदार्थांशिवाय कारवारी भोजन कधीच पूर्ण होत नाही. अशा या आगळ्यावेगळ्या कारवारी खाद्यसंस्कृतीने आजवर स्वतः चे वेगळेपण जपलेले असले तरी ती फारशी कधी प्रसिद्धीझोतात आली नाही. किंबहुना खूप लोकांना अजूनही ही खाद्यसंस्कृती परिचित नाही, म्हणूनच सॉलिटेअर रेस्टॉरंटने या खाद्यमहोत्सवाच्या माध्यमातून मुंबईकरांना कारवारी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी निमंत्रित केले आहे. कारवारी खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी आपण दि. ६ ते १७ नोव्हेंबर दरम्यान सॉलिटेअर रेस्टॉरंटमधील 'कारवारी फूड फेस्ट'ला सहमित्रपरिवार आवर्जून भेट द्या. एका सुगरणीचा गृहिणी ते मास्टरशेफ पर्यंतचा चविष्ट प्रवास श्रीमती माधवी कामत, एक सुगरण गृहिणी. मूळच्या कारवारच्या. पारंपरिक कारवारी पद्धतीचा स्वयंपाक करण्याची पहिल्यापासून आवड. स्वयंपाक बनवणं आणि लोकांना खाऊ घालणं हा त्यांचा छंदच. लग्नानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. माधवीताईंना सर्व प्रकारचं भोजन चाखता आलं मात्र कारवारची मूळ चव त्यांना कुठेच गवसली नाही. गवसली ती फक्त स्वतः च्या किचनमध्ये. आवड म्हणून त्या अनेकांना कारवारी पद्धतीचं भोजन खाऊ घालत. लोकही तृप्त होऊन जात. या आवडीतून त्यांनी एकेका वेळेस १५०-२०० लोकांनाही कारवारी भोजन खाऊ घातलं. त्यांचं हे कारवारी स्वयंपाकाचं वेड पाहून त्यांचे पती त्यांना कल्पना सुचली ती कोहिनूर कॉंटिनेंटलमध्ये कारवारी खाद्य महोत्सव करण्याची. अर्थात याची मुख्य सूत्र आली ती माधवीताईंच्या हाती. असं म्हणतात की सक्षम माणसं सोबत असली की उत्कृष्ट कल्पना सुचतात, हा त्यातलाच भाग होता. पाहता पाहता माधवीताईंनी कारवारी फूड फेस्टसाठी कंबर कसली. आपल्या पोतडीतल्या उत्तम पदार्थांची यादी केली. प्रत्येक पदार्थ हॉटेलच्या शेफना शिकवण्यासाठी ट्रेनिंग सुरू केलं. अर्थात मास्टरशेफच्या भूमिकेत स्वतः माधवीताईच होत्या. प्रत्यक्ष महोत्सवाआधी १५ दिवसांपासून रोज वेगवेगळे कारवारी पदार्थ 'ट्राय' होऊ लागले. अशा प्रकारे पहिल्या खाद्य महोत्सवला उत्तम प्रतिसाद मिळला आणि आता तिसऱ्या वेळीही तेवढ्याच जोमाने त्या परत एकदा तयार झाल्या आहेत. ६ नोव्हेंबरपासून हा खाद्य महोत्सव सुरू होणार असून १७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात प्रत्येक दिवशी माधवीताईंच्या देखरेखीखाली सुमारे ४० खाद्यपदार्थ तयार होत आहेत. यात विविध प्रकारचे मासे, खेकडे, कोळंब्या, चिकन यांच्यासोबतच चवळी, गवार, केळे-बटाटा-वांग काप, डाळ वडे यांसारखे शाकाहारी पदार्थांचीही रेलचेल आहे. महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी माधवीताई स्वतः रेस्टोरंटमध्ये उपस्थित राहतात व लोकांच्या प्रतिक्रिया न्याहाळतात. याबद्दल त्यांना कसं वाटतं या प्रश्नावर त्या म्हणतात, "लोकांना खरंखुरं पारंपरिक कारवारी पद्धतीचं खाऊ घालणं हे स्वप्नं होतं ते आज पूर्ण होतंय ते पाहून आनंद होतो. सर्व लोक चवीने खातात, त्यांना कारवारी पदार्थ आवडतात हे पाहून वेगळंच समाधान मिळतं." कोहिनूर कॉंटिनेंटलमध्ये मराठी खवय्ये, भारतातील इतर प्रांताचे तसेच इतर देशांतील खवय्येही येतात आणि त्या सर्वांना कारवारी खाद्यपदार्थ विशेष आवडत आहेत.

Share: