IMG-LOGO
प्रशासकीय

निवृत्तीधारकांना माहे नोव्हेंबर मध्ये हयातीचे दाखले सादर करण्याचे आवाहन

Friday, Oct 18
IMG

नाशिक जिल्ह्यातील राज्य शासकीय सेवा निवृत्ती वेतनधारक, कुटूंब निवृत्ती वेतनधारकांच्या याद्या निवृत्तीवेतन अदा करणाऱ्या सर्व बँकांना जिल्हा कोषागार कार्यालयाकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतुन निवृत्तीवेतन घेत असतील त्यांनी त्या बँकेत 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीत प्रत्यक्ष हजर राहुन यादीतील त्यांचे नांव पाहुन स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकाच्या समोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा तसेच पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती ही नोंदवावी. सोबत पॅनकार्डची छायांकित प्रत बँकेत सादर करावी तसेच दुरध्वनी क्रमांक नोंदवावा.

निवृत्तीधारकांना माहे नोव्हेंबर मध्ये हयातीचे दाखले सादर करण्याचे आवाहन  नाशिक, 18 :- नाशिक जिल्ह्यातील राज्य शासकीय सेवा निवृत्ती वेतनधारक, कुटूंब निवृत्ती वेतनधारकांच्या याद्या निवृत्तीवेतन अदा करणाऱ्या सर्व बँकांना जिल्हा कोषागार कार्यालयाकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतुन निवृत्तीवेतन घेत असतील त्यांनी  त्या बँकेत 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीत प्रत्यक्ष हजर राहुन यादीतील त्यांचे नांव पाहुन स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकाच्या समोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा तसेच पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती ही नोंदवावी. सोबत पॅनकार्डची छायांकित प्रत बँकेत सादर करावी  तसेच दुरध्वनी  क्रमांक  नोंदवावा.  निवृत्तीवेतनधारक ऑनलाईन पद्धतीनेसुद्धा ह्यातीचा दाखला सादर करु शकतात. ज्या निवृत्तीवेतनधारकांनी  यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरी  किंवा अंगठ्याचा ठसा केला नसेल किंवा संगणीकृत जीवनप्रमाण दाखल सादर केला नसेल त्यांचे निवृत्तीवेतन डिसेंबर 2019 पासून स्थगित करण्यात येईल. त्यामुळे निवृत्तीधारकांनी आपले हयातीचे दाखले बँकामार्फत किंवा ऑनलाईन जीवनप्रमाणपत्र सुविधेमार्फत नोव्हेंबर 2019 मध्ये सादर करावेत. तसेच आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांनी 2019-20 करिता नोव्हेंबर 2019 मध्ये आयकर परिगणना विवरणपत्र बचतीच्या  पुराव्यासह सादर करावे, असे आवाहन विलास गांगुर्डे  वरिष्ठ कोषागार अधिकारी , नाशिक यांनी केले आहे.

Share: