पावसानंतर मतदान केंद्रावर झालेल्या चिखल आणि दलदलीमुळे प्रशासनाने वेगळीच शक्कल लढविली. मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून मतदान केंद्रापर्यंत चक्क ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा पूल उभारला गेला.
पावसानंतर मतदान केंद्रावर झालेल्या चिखल आणि दलदलीमुळे प्रशासनाने वेगळीच शक्कल लढविली. मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून मतदान केंद्रापर्यंत चक्क ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा पूल उभारला गेला.बारामती तालुक्यातील कावळेश्वर येथील मतदान केंद्रात मतदारांसाठी ही सुविधा उभारण्यात आली. लोकशाही प्रक्रियेत मतदार हा राजा असतो आणि त्यासाठी या अशा पायघडड्या घातल्या जातात याचा प्रत्यय पुन्हा एकदा या मतदानप्रक्रियेत आला. सध्या हे छायाचित्र व्हायरल होत असून त्याचीच चर्चा रंगली आहे.कालपासूनच राज्याच्या विविध भागांत पावसाचे सावट आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. आजही मतदान सुरू होण्याच्या वेळेस पुणे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा काही भाग पावसाने व्यापला. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदान केंद्राबाहेर पाणी साचून चिखल झाल्याचे चित्र होते. परिणामी मतदान संथ गतीने सुरू होते. मात्र गैरसोय टळावी म्हणून प्रशासनाने कावळेश्वर येथे अशी वेगळीच शक्कल लढविली.वृद्ध आणि अपंग मतदारांसाठी व्हिलचेअर, तसेच मतदान करणाऱ्या मातांच्या बालकांसाठी तात्पुरत्या पाळणाघरांची सोय मतदान केंद्रांवर उभारली आहे. त्याचा लाभ मतदार घेताना दिसत आहेत.