IMG-LOGO
नाशिक शहर

विशेष बातमी जन्मतः नेत्रहीन असलेल्या स्वातीने दहावीला मिळवले 82% गुण

Sunday, Aug 02
IMG

विशेष बातमी जन्मतः नेत्रहीन असलेल्या स्वातीने दहावीला मिळवले 82% गुण नाशिक दि.2आॅगस्ट 2020 :- यंदाचे इयत्ता दहावीचे निकालात विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम गुणवत्ता प्राप्त केली आहे. नाशिक येथील मातोश्री रामप्यारी बाई सारडा कन्या विद्यामंदिर ची विद्यार्थिनी कुमारी स्वाती गजानन जाधव हिने इयत्ता दहावीला 82% गुण मिळवले आहेत. कु. स्वाती ही जन्मतः दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. खूप मोठे होण्याची जिद्द असलेली स्वाती त्यासाठी मन लावून अभ्यास करते, नियमित शाळेत जाते तसेच ती छानपैकी गाणे ही म्हणते. शरीराच्या अडचणींवर मात करून स्वाती जास्तीत जास्त आत्मनिर्भर राहते. स्वातीची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तिला उच्च शिक्षण घेण्याची जिद्द आहे. त्यासाठी तिला मार्गदर्शन व आर्थिक मदत मिळण्यास महत्वपूर्ण ठरणार आहे. शुक्ल यजुर्वेदीय मध्यंदिन ब्राह्मण संस्थेने तिचे अभिनंदन केले आहे.

विशेष बातमीजन्मतः नेत्रहीन असलेल्या   स्वातीने दहावीला मिळवले               82% गुण नाशिक दि.2आॅगस्ट  2020 :-यंदाचे इयत्ता दहावीचे निकालात विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम गुणवत्ता प्राप्त केली आहे.नाशिक येथील मातोश्री रामप्यारी बाई सारडा कन्या विद्यामंदिर ची विद्यार्थिनी कुमारी स्वाती गजानन जाधव हिने इयत्ता दहावीला 82% गुण मिळवले आहेत. कु. स्वाती ही जन्मतः दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. खूप मोठे होण्याची जिद्द असलेली स्वाती त्यासाठी मन लावून अभ्यास करते, नियमित शाळेत जाते तसेच ती छानपैकी गाणे ही म्हणते. शरीराच्या अडचणींवर मात करून स्वाती जास्तीत जास्त आत्मनिर्भर राहते. स्वातीची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तिला उच्च शिक्षण घेण्याची जिद्द आहे. त्यासाठी तिला मार्गदर्शन व आर्थिक मदत मिळण्यास महत्वपूर्ण ठरणार आहे. शुक्ल यजुर्वेदीय मध्यंदिन ब्राह्मण संस्थेने तिचे अभिनंदन केले आहे.

Share: