IMG-LOGO
राष्ट्रीय

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने कोरोना लसीची किंमत ठरवली !

Friday, Aug 07
IMG

कोरोनावरील लस लवकर तयार व्हावी आणि नागरिकांसाठी ती उपलब्ध व्हावी यासाठी संपूर्ण जगातून प्रयत्न सुरूच आहेत.

पुणे : दि ०७ ऑगस्ट : कोरोनावरील लस लवकर तयार व्हावी आणि नागरिकांसाठी ती उपलब्ध व्हावी यासाठी संपूर्ण जगातून प्रयत्न सुरूच आहेत. मात्र कोरोना लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि स्वस्तदेखील असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारताच नव्हे तर जगातील गरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना अशी परवडणारी लस उपलब्ध करून देण्याचा भारताचा मानस आहे आणि त्या दिशेने आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.सीरम इन्स्टिट्युटने GAVI या आंतरराष्ट्रीय लस संस्थेशी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशी भागीदारी केली आहे. जवळपास १०० दशलक्ष डोस पुरवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या तिन्ही संस्था मिळून भारतासह इतर गरीब देशांसाठी २०२१ पर्यंत १०० दशलक्ष कोरोना लसीचे उत्पादन करतील अशी आशा आहे. या लसीची किंमत ३ यूएस डॉलर म्हणजे भारतीय किमतीत फक्त २२५ रुपये असेल. यासाठी गेट्स फाऊंडेशन १५० मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे.सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे.

Share: