विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 5 पर्यंत सरासरी 54.53 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक आयोगाच्या ॲपवर देण्यात आली आहे. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पहिल्या दोन तासांत अवघे दीड ते दोन टक्के मतदान झाले होते
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 5 पर्यंत सरासरी 54.53 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक आयोगाच्या ॲपवर देण्यात आली आहे. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पहिल्या दोन तासांत अवघे दीड ते दोन टक्के मतदान झाले होते, मात्र अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्यानंतर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे. राज्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी 15 % मतदान झाले होते. त्यानंतर त्यात वाढ झाली. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्र खराब झाल्याच्या आणि त्यामुळे मतदानाला खोळंबा झाल्याच्या तक्रारी आहेत. मुंबईतील वरळी, रत्नागिरी आणि भंडारा जिल्ह्यात अशा तक्रारी होत्या. त्यामुळे मतदान काही काळ थांबवावे लागल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात कॉँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.दरम्यान राज्याचे विद्यमान मंत्री, केंद्रीय मंत्री, बॉलीवूड अिाण मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत यांनी आज मतदान केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली आई आणि पत्नीसह मतदान केले. राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी जावई आणि नातीसह मतदानाचा हक्क बजावला. दादर येथे मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सपत्नीक मतदान केले. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी मुलगा अर्जुन आणि पत्नी अंजलीसह मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर यांनीही मतदान केले. याशिवाय हेमा मालिनी, प्रशांत दामले, गुलजार, आमिर खान, गोविंदा यांसारख्या कलाकारांनीही मतदान केले.महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होत आहे. राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 15 टक्के मतदान. जिल्हा आणि टक्केवारी अशी :(सकाळी 11 वाजेपर्यंत )● नंदुरबार : 18.77 ● धुळे : 17.18 ● जळगाव : 12.30 ● बुलडाणा : 15.92 ● अकोला : 15.65 ● वाशिम : 13.18 ● अमरावती : 15.21 ● वर्धा- नागपूर : 14.08 ● भंडारा : 14.78 ● गोंदिया : 15 ● गडचिरोली : 20 ● चंद्रपूर : 17 ● यवतमाळ : 19 ● नांदेड : 13 ● हिंगोली : 19 ● परभणी : 11 ● जालना : 17 ● औरंगाबाद : 14 ● नाशिक : 14 ● ठाणे : 12 ● मुंबई उपनगर : 13 ● मुंबई शहर : 13 ● रायगड : 18 ● पुणे : 14 ● अहमदनगर : 14 ● बीड : 14 ● लातूर : 10 ● उस्मानाबाद : 12 ● सोलापूर : 12 ● सातारा :15 ● रत्नागिरी :19 ● सिंधुदुर्ग : 18 ● कोल्हापूर : 21 ● सांगली : 11 ● पालघर : 16